Episode 9: निवडणूक बाँड योजनेचा राजकीय पक्षांच्या आर्थिक पारदर्शकतेवर विपरीत परिणाम - a podcast by Association for Democratic Reforms

from 2021-02-18T11:49:23

:: ::

हा भाग एडीआरने सुरू केलेल्या पॉडकास्ट मालिकेचा नवा भाग आहे, ज्यामध्ये आपण माजी अर्थमंत्री श्री अरुण जेटली यांनी सादर केलेली निवडणूक बाँड योजना २०१८ पाहू ज्याचा उद्देश राजकीय निधी पारदर्शक बनविणे आहे. मार्च २०१८ ते जानेवारी २०२० या कालावधीत, निवडणूक बाँड विक्रीच्या तेरा टप्याच्या कालावधीत निवडणूक बाँड योजना २०१८ च्या अंतर्गत रु. ६२१०.३९ कोटीचे चे एकूण १२४५२ बाँडची विक्री झाली. यातील रु. ६१९०.१४ कोटीचे १२३१२ बॉंडची वैधता कालावधीत राजकीय पक्षांद्वारे नगदीकरण केले गेले. निवडणूक बाँडद्वारे राजकीय पक्षांना देणगी देणार्या कोणत्याही व्यक्तीचे / संस्थेचे नाव जाहीर करणे आवश्यक नाही. अशा प्रकारे रु. ६००० कोटीपेक्षा अधिक चे बॉण्ड खरेदी करणाऱ्या एकाही देणगी दाराची सार्वजनिक क्षेत्रात ओळख पटलेली नाही. एडीआर द्वारे विश्लेषित आकडेवारी ऐकल्यानंतर, श्रोत्यांनी या योजनेने राजकीय निधीत पारदर्शकता आणली आहे की नाही याचा विचार केला पाहिजे.


टीप: आपण आम्हाला अभिप्राय, टिप्पण्या आणि सूचना adr@adrindia.org वर पाठवू शकता.

Further episodes of ADR Speaks

Further podcasts by Association for Democratic Reforms

Website of Association for Democratic Reforms